RSS

whatsapp star “⭐”

वाट्सअॅपवर ‘स्टार’चा नवीन पर्याय 🚀

नवी दिल्ली- तरुणाईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपने आणखी दोन नवीन फिचर्स युझर्ससाठी आणले आहेत. जर तुम्हाला महत्त्वाचे मॅसेजेस आले आहेत आणि ते नंतर वाचायचे असतील तर त्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘स्टार’चा नवीन पर्याय दिला आहे.

व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी नेहमी नवनवीन फिचर्स देत असते. व्हॉट्सअॅपने आता ‘स्टार’ आणि ‘गुगल बॅकअप’ हे दोन नवीन फिचर्स दिले आहेत. त्यामुळे युझर्सला महत्त्वाचे मॅसेजेस जतन करून ठेवता येणार आहेत. ‘स्टार’मुळे युझर्सला मॅसेजेस शोधणे सोपे जाणार आहे.

या फिचर्ससाठी युझर्सला नवे व्हर्जन डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. जर ते झाले नाही तर व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येणार आहे.

🎉 ‘स्टार’चा पर्याय

महत्त्वाचे मॅसेज आले आहेत, पण ते वाचण्यासाठी वेळ नाही अशा मॅसेजेसवर ‘स्टार’ करून ठेऊ शकतो. जे तुम्हाला नंतर वाचण्यासाठी शोधणे सोपे होणार आहे. ‘स्टार’ हा पर्याय याआधी जीमेलमध्ये देण्यात आला आहे तसाच पर्याय व्हॉट्सअॅपवर देण्यात आला आहे.

🎉 ‘गुगल ड्राईव्ह बॅकअप’ काय आहे?

व्हॉट्सअॅपने गूगलबरोबर बॅकअपसाठी करार केला आहे. यामुळे युझर्स व्हॉट्सअॅपचा बॅकअप गुगल ड्राईव्ह घेऊ शकणार आहे. यामध्ये फोटो, गाणी, व्हिडिओही तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सेटींगमध्ये जाऊन चॅट अँड कॉल्समध्ये जाऊन बॅक अप चॅटचा पर्याय मिळेल. येथून तो बॅकअप मिळवता येणार आहे.
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲

⚡अशाच प्रकारच्या सुमारे 21 मराठी वर्तमानपत्रांच्या बातम्या असणारे मराठमोळे ॲप maha.news डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
http://app.appsgeyser.com/Maha.news
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 

टिप्पण्या बंद आहेत.