RSS

लेखनकौशल्य

🌟🌟🌟🌟 (म – मराठीचा) 🌟🌟🌟🌟

            📝 लेखनकौशल्य 📝
========================
लेखनकौशल्याला शिखरीभूत कौशल्य असे म्हणता येईल. “लेखन कौशल्य” ही भाषिक कौशल्यातील पाचवी पायरी आहे.

भाषाविषयक कौशल्याच्या पाय-या :
५ – लेखन
४ – वाचन
३ – भाषण
२ – संभाषण
१ – श्रवण

‘पायरी’ या शब्दावरून आपल्याला विकासाचा क्रम सुचवावयाचा आहे. ज्याप्रमाणे एक पायरी चढल्याशिवाय पुढील पायरी आपण चढू शकत नाही, त्याचप्रमाणे एक कौशल्य पूर्ण झाल्याशिवाय दुसरे कौशल्य आत्मसात करता येत नाही किंवा एक कौशल्य हे पुढील कौशल्याचा आधार असतो.

आपण भाषाविकास साधत असतांना या प्रत्येक पायरीचा विचार त्या – त्या स्तरावर करणे आवश्यक आहे. पाचव्या पायरीवर आपण असलो, तरी पहिल्या पायरीचे महत्त्व संपत नाही. याप्रमाणे आपण ‘लेखनाच्या’ पाचव्या पायरीवर असलो, तरी ‘श्रवणाचे’ महत्त्व सपत नाही. पाचव्या पायरीवर असतांना पहिली ते पाचवी पायरी या पाय-यांवरील कौशल्ये बरोबर असतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर या पाचही पाय-यांचे व त्यावरील मुद्यांचे  महत्त्व भाषासाधनेत अबाधितच आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
      🙏संकलक🙏
    ✏आशा चिने
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌼

 

टिप्पण्या बंद आहेत.