RSS

संदर्भ कुमठे बीट…

        कुमठे बीटात आढळलेल्या उल्लेखनीय बाबींविषयी थोडक्यात माहिती …

❇ सातारा कुमठे बिटातील ३९ शाळा ज्ञानरचनावाद प्रणालीचा उत्तमरित्या  वापर करतात.

❇ शाळांमध्ये प्रत्येक वर्गात  दगड ,बिल्ले, पिकांची देठं,माचिसच्या काड्या (दशकासाठी दहा काड्यांची जुडी),मातीचे/प्लास्टिकचे मणी,बांगडीच्या काचा, सनमाइकचे तुकडे, राजमा,सोयाबीन , वाटाणे,आईसक्रीमचे लाकडी /प्लास्टिक चमचे, स्ट्रॉ, प्लास्टिक शीटचे(गाडीसाठी वापरतात ते) तुकडे ,शब्दकार्ड,इत्यादी अल्पखर्चिक साहित्याचा मुबलक साठा आहे.हे साहित्य भिंतीच्या कडेला लाकडी फळ्यांवर बरण्या,ट्रे,वाडगे यात ठेवलेले आहे.

❇ नविन कृती/विषय सुरु करुया अस शिक्षकांनी सांगितले की मुले आधीच्या कृतीसाठी घेतलेले साहित्य लगेचच त्या-त्या ठिकाणी नीट ठेवतात.

❇अप्रगत मतीमंद मुलांना स्पेशल वर्गात बसवून त्यांना विविध आकार बनवणे दशकाची ओळख इत्यादी कृती करुन घेतल्या जातात.

❇नोटांच्या झेरॉक्स काढून त्या प्लास्टिक शीट वर चिकटवून त्यांचा वापर करुन च हिशोब शिकवला जातो.

❇बैजीक राशी समीकरण शिकवण्यासाठी विविध प्लास्टिक ग्लास वापरले आहेत.

❇प्रत्येक वर्गात फर्शीवर अॉईलपेंटने बेरीज वजाबाकी गुणाकार-भागाकार, काचा-कवड्यांचा खेळ,१००अंक, बाराखडी वाचन-लेखनाचे फुल,भौमितिक आकार काढलेले आहेत.मुलं बराचसा सराव फर्शीवरच करतात.

❇तिसरी-चौथीच्या मुलांकडे २००पानी वहीत शब्द संग्रह केलेला आहे [मराठी शब्दकोशसारखा]
मुलं नविन शब्दांचा अर्थ शब्दकोशात शोधून वहीत लिहून घेतात.

❇अक्षर दिले तर त्यापासून सुरु होणारे अनेक शब्द सांगतात. शब्द दिला तर त्यासंबंधी वाक्य सांगतात.

❇ दोन-तीन शब्द दिले तर गोष्ट बनवतात.

❇१००वाटाणे,१०० कोणतीही कडधान्ये लहान-लहान कापडी पिशव्यांत भरुन शतक ची थैली बनवली आहे. दहा आईसक्रीम चे चमचे रबर ने बांधून दशकासाठी वापरतात.उदाहरणे सोडवताना यांचाच गटात वापर करतात.त्यामुळे हातच्या ची संकल्पना स्पष्ट झालेली आढळते .

❇तिसरी-चौथीच्या मुलांच्या स्वतःच्या कविता लिहीलेल्या वह्या आहेत.

❇प्रत्येक वर्गात दोन खोके आहेत त्यावर साधे कागद प्लास्टिक कागद अशी नावे आहेत.

  ❇चौथीची मुलं भेटीसाठी आलेल्या शिक्षकांची मुलाखत घेतात.

❇ताटात/ट्रेमध्ये माती भरुन धुळपाटी बनवली आहे. 
                       – संकलन
                       आशा चिने
                जि. प. शाळा तळेवस्ती

                 

 

टिप्पण्या बंद आहेत.