RSS

आदर्श परिपाठ

📟📟📟📟📟📟📟📟
📟आदर्श डिजीटल साउंड परिपाठ
📟📟📟📟📟📟📟📟

🎯जर आपल्या शाळेत परिपाठासाठी साउंड सिस्टीम असेल तर उत्कृष्टच!!!

💿नसेल तर हरकत नाही आपण आता पाहूया एकदम
कमी खर्चात डिजीटल साउंडचा परिपाठ कसा बनवावा…

🔈आवश्यक साहित्य🔈

1⃣ Audio Jack (headphone input) असलेला कोणताही मोबाईल

2⃣परिपाठातील सर्व गीते डाउनलोड केलेले मेमरी कार्ड

3⃣ आदर्श परिपाठ कसा घ्यावा याच्या पायऱ्या

4⃣ किमान २ हजारापासूनचे sound box
(Intex कंपनीचे स्वस्त व चांगले आहेत)

📱कार्यवाही📱

1⃣ परिपाठ गीते असलेला मोबाईल साउंड बॉक्सला जोडा.

2⃣ परिपाठासाठी हवे ते गीत प्ले करा.

🎤आदर्श परिपाठ कसा घ्यावा?🎤

👇

प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी ५-६ विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार गट पाडावेत.त्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकांची जबाबदारी सोपवावी. आठवड्यातील ६ वार वर्गवार विभागून द्यावेत.
उदा. सोमवार-८वी
मंगळवार-७वी असे…

आपणास परिपाठासाठी ३०मिनीटे वेळ असल्याने पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.

1⃣ सावधान- विश्राम आदेश

संचालन करणा-या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.

2⃣ राष्ट्रगीत

सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद्वारे राष्ट्रगीत घ्यावे.

3⃣ प्रतिज्ञा

आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिस-या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी. किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही सादर करता येईल.
(विद्यार्थ्यांचा स्तर पाहून बदल करता येईल.
उदा-७वी-८वी-इंग्रजी, ५वी-६वी-हिंदी, ३री-४थी-मराठी)

4⃣ भारताचे संविधान

परिपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील. याही ठिकाणी शक्य असल्यास इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतून संविधान घेता येईल.

5⃣ प्रार्थना व श्लोक

ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे. प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत, ज्यातून मानवता, दया, त्याग अशा गुणांची रुजवण होईल अशा असाव्यात.

6⃣ आजचा दिवस

केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो, कोणता वार आणि कोणती तारीख आहे.

7⃣ सुविचार

सुविचार म्हणजे सुंदर असे विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे–संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

8⃣ दिनविशेष

चला जाणून घेऊया, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे—–.(विद्यार्थ्याचे नाव)

9⃣आजची म्हण व वाक्यप्रचार-

कमी श्ब्दात जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण घेऊन येत आहे—-(विद्यार्थ्याचे नाव)
त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची संधी समोर उपस्थित विद्यार्थ्यांना द्यावी.

🔟बातमीपत्र-

जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते अशाच आजच्या बातम्या घेऊन येत आहे– संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.

1⃣1⃣ समूहगीत/देशभक्तीपर गीत-

आठवड्यातील ६ दिवस वेगवेगळी गीते घ्यावीत. त्यात एखादे स्फुर्तीगीतही असावे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे. Mp3 फॉरमँटमधील गीते खाली दिलेल्या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

1⃣2⃣बोधकथा

आजची बोधकथा घेऊन येत आहे— संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे. सुंदर व वाचनीय बोधकथा खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

1⃣3⃣ प्रश्नमंजुषा

आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे–संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे.ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारले तर चांगले.)

1⃣4⃣ वैज्ञानिक दृष्टिकोन-

समाजात अनेक समज-गैरसमज असतात. त्यामूळे अंधश्रद्धा पसरतात, म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.
(शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.)

1⃣5⃣इंग्रजी शब्दार्थ

आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे– संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)

1⃣6⃣दिनांक तो पाढे-

आजचा पाढा घेऊन येत आहे— संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.
( प्रतिदिन २ ते ३१ पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

1⃣7⃣ आजचे वाढदिवस

स्वतःचा जन्मदिवस स्वतःसाठी खास असतो. तर असे आजचा दिवस खास बनवणारे आहेत—
वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी/शिक्षकांचे नाव घ्यावे व फुल किंवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.

1⃣8⃣ पसायदान

बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसुन समूहाने पसायदान घ्यावे.

1⃣9⃣मौन

२ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.

2⃣0⃣ विसर्जन

विद्यार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

पहा येथे  ….. सर्व mp3 परिपाठ

 

टिप्पण्या बंद आहेत.