RSS

चला शिकूया सरासरी

🌺 चला शिकूया सरासरी 🌺

नमस्कार मित्रानो,
सरासरीच्या आपण दैनंदिन व्यवहारात नित्य वापर करतो पण बऱ्याचदा आपल्या ते लक्षात देखील येत नाही. हा घटक व्यवहारात अतिशय उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षेत यावर आधारित प्रश्न असतातच. थोड्या सरावाने हा घटक हमखास मार्क मिळवून देऊ शकतो ते कस हे आपण पाहू.

यासाठी काही सूत्र पाठांतर असणे गरजेचे आहे ती सुत्र खालीलप्रमाणे:

१) सरासरी=
  एकूण सर्व संख्यांची बेरीज
——————————————
        एकूण संख्या

२)सरासरी × एकूण संख्या = एकूण सर्व संख्यांची बेरीज

३) क्रमवार संख्यांची सरासरी=
पहिली संख्या + शेवटची संख्या
————————————————
                    २

४)पहिल्या क्रमवार सम संख्यांची सरासरी =
(एकूण सम संख्या + १)

५) क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी =
           n + १
    ———————-
              २
यावर आधारित उदा. खालीलप्रमाणे

१)विजयला एका परिक्षेतील ४ पेपर मध्ये अनुक्रमे ४५, ४७, ७८, ८० गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?
▶▶ सुत्र क्रमांक १ वर आधारित

२)१४ संख्यांची सरासरी ३२ आहे तर त्या सर्व संख्यांची बेरीज किती?
▶▶ सुत्र क्र. २ वर आधारित

३) २२, २३, २४, २५, २६, २७ या क्रमवार सम संख्यांची सरासरी किती?
▶▶ सुत्र क्रमांक ३ वर आधारित

४)पहिल्या क्रमवार १० संख्यांची सरासरी किती?
▶▶ सुत्र क्रमांक ४ वर

५) १ ते ६५ या संख्यांची सरासरी किती?
▶▶ सुत्र ५ वर आधारित

.

धन्यवाद..!👏👏👏

✒ संकलन ✒
आशा चिने

 

टिप्पण्या बंद आहेत.