RSS

बेरीज अध्ययन अध्यापनातील अडथळे व उपाययोजना

गणितीय मुलभूत क्रिया… बेरीज अध्ययन अध्यापनातील अडथळे व उपाययोजना

👉 सध्या आंतरराष्ट्रीय अंक ०ते९ही दहा चिन्हे म्हणून निवडली गेली आहेत.ही दहा असल्याने ह्याला दशमान पध्दत असे म्हणतात.
त्यामुळे०ते९ही मुळाक्षरे लहानपणीच नीट गिरवली तर गणित विषयाची भीती कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
घड्याळावरच्या१२खुणा नसत्या तर काळ वेळेचा फक्त अंदाजच करता आला असता.

👉 बेरीज या शब्दाचा अर्थच कळत नाही सुरूवातीला  मुलांना.मिळवणे हे ही कळत नाही. मात्र चिञाच्या सहाय्याने हळूहळू सुधारणा  होते हा स्वानुभव.
लेखी उदा.देण्या ऐवजी एकक अंकाच्या मिळवण्या घेतल्यास खूपच फायदा  होतो.

👉 एक चंद्र,एक सूर्य,नऊ ग्रह,असंख्य,अनंत सूर्यमाला हातापायांना असलेली बोटे,तोंडातील एक जीभ,दोन डोळे,बत्तीस दात-किती,किती म्हणून संख्या अवतीभवती विखुरल्या आहेत.आपण विचार करत नाही तो पर्यंत त्या दिसत सुध्दा नाहीत.

👉 मुलांना englishहा विषय पहिलीपासून सुरु करण्यात आला आहे,पहिली ते चौथीतर्यंत मराठी अंक का?
ज्या प्रमाणे पालक शिक्षक मुलांचं अक्षर सुधारण्याचि प्रयत्न करतात, मुलांचं अक्षर वळणदार सुंदर असावं ह्यासाठी युक्त्या उपक्रम वापरल्या जातात त्याप्रमाणेच संख्या लिहीणे सुव्वाच सुंदर ह्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत….कारण
1)1एक,हा अंक बरेच मुले1असा काढतात,कारण त्यानातसेच शिकवल जातं.त्यामुळे मुलाचा तो एक काही वेळा7असा होतो,तर काही वेळा दोन होतो आणि नग मूळची उदाहरणातली संख्या लक्षात नसल्यानं मूल तो ते उदाहरण सात किंवा दोन घेऊन सोडवतो.

👉 Concept of Backword and forward counting is important in addition

👉 बेरीज म्हणजे मिळवणे, एकत्र करणे हे समजणे अगत्याचे..

👉 सर्वात प्रथम असे की बेरजेची क्रिया करण्याआधी विद्यार्थ्याना संख्या अचूक लिहिता यावी हे महत्वाचे कारण बेरजेची क्रिया काही  विद्यार्थी बरोबर करतात मात्र उत्तर अचूक लिहिता येत नाही हा महत्वाचा मुद्दा..

👉 लेखी पेक्षा कृतीच महत्वाची…. नुसते चित्र, अंक नकोचं..

👉 🙌 +✌= 12

अस शिकवण्या पेक्षा practical experience द्यावा

👉 बेरजेची क्रिया शिकवायची असल्यास प्रथम विद्यार्थ्याना आपण सांगितलेल्या संख्येनुसार खड़े/खडू/मनी वा इतर आणायला हव्यात

👉 मुलांना आपण खडे, शंखशिंपले, गोट्या ही हाताळवयास द्यावयास हवी.. ती एकास एक ह्याप्रमाणे मोजतात का हे पहावयास हवे.. नाहीतर सगळे मुसळ केरात ..

👉 note book, pen is for practice n to know how much we have learned

👉मुलांना अंक ओळख देण्याआधीचं मोजणे ही क्रिया नीट येते का पहावे..

👉 बेरजेची क्रिया शिकवण्याआधी फक्त संख्येनुसार वस्तु आनायला हव्यात आणि कळत न कळत बेरजेकड़े आपण जायला हवे

👉 सुरूवातीला
मुलांना बेरीज हा संबोध स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण कृतीयुक्त  अध्ययन अनुभव देता येतात
त्यासाठी परिसरातील पाने फुले ,छोटे छोटे दगड, गोट्या इ.वापर करता येईल.
त्यातून बेरीज म्हणजे मिळवणे हे मुलांना समजेल

काही दिवस अशीच पद्धत घेतल्यानंतर आपण सारणी पद्धत वापरू शकतो त्यामुळे मुलांची उदाहरणे सोडवण्याविषयी गती वाढेल.

👉 चौकटी आखून त्यात उभे करणे व बेरीज करुन घेणे

👉 सगळे कळत नकळत.. मग मुलांना गणिताची भीती वाटतं नाही..

👉 डायस वापरुन पण बेरीज करता येईल

👉 मोजणे-अंक –  बेरीज कृती ने-+चिन्ह… आकलन झाले की सारे सोप्पे..

👉 संख्या

वस्तूंचा समूह,दोन समूहातील लहान-मोठेपणा ठरवण्याच्या गरजेतून मोजण्यासाठी विशिस्ट चिन्हांचा उपयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे पुढील दहा चिन्हे अथवा ध्वनीचा उपयोग करतात त्यास अंक म्हणतात . 1,2,3,4,5,6,7,8,9,0

कितीही मोठा समूह किंवा समुहाचा लहनात लहान भाग या अंकांचा मदतीने दर्शवता येते त्यास संख्या असे म्हणतात.

विविध खेळ

उद्देश : 0 ते 99 संख्यांची समज व लेखन

साहित्य : आईस्र्म्चे चमचे,रबर बॅंड,संख्यामाळ,बांगडी,लहान-मोठ्या ठिपकयांचा कागद

कृती : प्रत्येक मुलाला 10 आईस्र्म्चया काड्याना रबर बॅंड लाऊन 10-10 चे गठ्ठे तयार सांगणे.दोन मुलांच्या गटात असे 10-10 चे गठ्ठे व सुटे चमचे ठेवावेत.विशिष्ट समूह घेऊन तो किती आहे ते दुसर्‍याने ओळखावे व त्याची नोंद करावी .

   10चे गठ्ठे        सुटे        एकूण

उदा. 2              5          25

👉 एक अंकी बेरीज घेतांनाचं घरे आखण्याची सवय लावावी..

👉 स्ट्राॅचा वापर करता येतो.. मुलांना आवडतात माळी ओवायला..

👉 अंकाच्या पुढं मोजून बेरीज केली तर उदाहरणे सोडवण्याविषयी गती वाढते

👉 दहाचा खेळ

दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला करायचं आहे.

आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.

शाब्दिक उदाहरणे :

·         मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.

·         प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.

·         शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.

·         सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.

·         तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने

·         मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.

·         तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.

·         संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.

👉 How to Carry
this concept n reason behind it should be explained

👉 पुढे मोजणे म्हणजेही बेरीज.. संख्यापट्टीचा वापर आवश्यक..

👉 बाकांच्या ओळीप्रमाणे गट करून ह.श.द.ए.याप्रमाणे गटांना नावे द्यावीत.फळ्यावर गटानुरूप भाग पाडून गटांची नावे लिहावीत.मुलांना ०ते९ अंक द्यावेत.एखादी संख्या पुकारून प्रत्येक ओळीतील एकाएका मुलाला पुढे बोलवावे.फळ्यावर दाखवलेल्या स्थानानुरूप त्यांना उभे करावे.मुले आपल्याजवळील अंकाचे कार्ड दाखवून संख्या-स्थान,विस्तार,स्थानिक किंमत इ.सांगतील.अंकाची अदलाबदल करुन स्थानिक किंमतीतील फरकही घेता येईल.

👉 याच्यत वर्गातील अनेक  साहित्य  वापरता येईल. खडू तुकडे क्रमिक  पुस्तके  वह्या  आरसा  कंगवा  पेपर रंगीत  खडूचे तूकडे   इतर अनावश्यक  साहित्य बेरीज  करतांना वि. सहज  हाताळता येतात.

👉 Making Multiples of Ten – This strategy is a natural follow-up to making ten, as it uses the same number combinations in a different way. When teaching this strategy, students will learn to use the making ten facts in equations such as 27+3. In this case, students will see the ones digits and realize that 7 and 3 make 10, so 27 and 3 makes 30.

👉 दोन अंकी बेरीज करतांना हाताचा मांडण्यास सांगावे म्हणजे मुले हाताचा विसरत नाही..

👉 बेरीज.. व्यावहारिक सांगड महत्वपूर्ण आहे.. पोपटपंची नको

👉 बाजारहाट उपक्रम…मस्त आम्ही दर जानेवारीत घेतो

👉 बचत बॅंक हा उपक्रम…..जुलै पासून वर्षभर राबवितो…

👉 मुले स्वंयअध्ययनात रंगून जातात.
मुले  स्वतःच्या  आवडीनुसार  शिकू  शकतील.

👉 मुलांना प्रत्यक्ष कृतीतुन शाब्दिक बेरीज शिकविता येईल

👉 please visit…….. खुप छान गणित साईट…..http://www.thefreemath.org/2327233923672340236623302375-234323372375.html.

👉 https://phet.colorado.edu/mr/simulations/category/new

👉 Appuseries
one of the best educational channel on you tube

👉 तोंडी बेरीज शिकवतांना –
      ६
+
        ७=?

मुलांना सांगावे वरची संख्या डोक्यात ठेवा.. व आपण कृती करावी.. हात आपल्या डोक्यावर ठेवावा.. व पुढे मोजा सांगावे.. मुलांना फार आवडते..

👉 बेरीज करताना विद्यार्थ्याना संख्या ज्ञान करून देणे महत्त्वाचे आहेच पण त्या बरोबर बेरजेचे उदाहरण लिहिताना एकक खाली एकक व् दशक खाली दशक लिहिनेही खुप महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्याना ते समजून सांगणे महत्त्वाचे आहे

👉 गणित हा तर्कशक्तीचा पाया आहे.. Maths is easy only when u have strong basic

👉 बेरजे साठी ppt तयार करुण दिलेल्या संख्ये एवढ्या वस्तू animation effect देवून आल्यास खुप प्रभावी होईल

👉 Teaching aids, ppt, video यांचा वापर काळाची गरज.. तरच संकल्पना स्पष्ट होईल

👉 नवनिर्मीती, पुणे येथील गणिताचे साहित्य खूप उपयोगी आहे..

👉 शैक्षणिक साहित्याचा वापर वाढविणे गरजेचे आहे

९९ पर्यंतच्या संख्यांच्या स्थानिक किंमतीची कल्पना मुलांना नाणी आणि नोटांच्या मदतीने द्यावी.
दशक-एकक हे शब्द मात्र  उशिरा वापरावे. 
कारण हे अपरिचित शब्द सुरुवातीला वापरल्यामुळे मुलांचा गोंधळ होतो असा अनुभव आहे.
एकाचे नाणे म्हणजे एकक आणि दहाची नोट म्हणजे दशक असा परिचय करून द्यावा.

👉 संबोध स्पष्ट – कृती-साहित्य-सराव – प्राविण्य..

👉 पाठ्यपुस्तके अत्यंत प्रभावी आहेत नवीन अभ्यास क्रमाची
जास्तीत जास्त चित्र व उदाहरण आहेत
मुलांना व शिक्षक यांनी वापर वाढवावा
बरेच वेळा आपण फळ्यावर उदाहरण देतो मनाची
पण तीच उदाहरण पुस्तकातील असतील तर मुले पुस्तकातील उदाहरणात रमतात

👉 मुलं चुकणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे.. ते कुठे चुकतात हे शोधल पाहिजे.. उपाययोजना केलीचं पाहिजे..

👉 गणित विषय कागदावर कमी व् कृतिवर जास्त असेल तर तो मुलाना नकीच् आवडेल

👉 संबोध स्पष्ट होण्यासाठी कृतीतुन शिक्षण व पुरक म्हणुन è learning चा वापर गरजेचाच

👉 क्रमिक पाठ्यक्रम म्हणजे सर्व काही नाही… आपण पाठ्यपुस्तक वरच भर देत राहतो हे चुकिचे. फक्त  त्या त्या  इयत्तेच्या क्षमता माञ माहित हव्यात… शिक्षकाचे ज्ञान आद्यवत व परिपूर्ण असावे त्यामूळे स्वतः चा आत्मविश्वास नक्कीच वाढतो..

 

यावर आपले मत नोंदवा