RSS

डॉ. एपीजे अब्दुल कलाम

.

ए.पी.जे. अब्दुल कलाम

image

image

पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म १५ ऑक्टोबर १९३१
रामेश्वर
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म मुस्लीम
पुरस्कार पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील जैनुलाबदिन अब्दुल

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

अनुक्रमणिका

    १ शिक्षण
    २ कार्य
    ३ गौरव
    ४ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द
    ५ अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
    ६ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके
    ७ संदर्भ

शिक्षण

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.
कार्य

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

    डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

गौरव

    भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

Year of Award or Honor Name of Award or Honor Awarding Organization
१९८१ पद्मभूषण भारत सरकार [२][३]
१९९० पद्मविभूषण भारत सरकार [२][३]
१९९७ भारतरत्न भारत सरकार[३][४]
१९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार भारत सरकार [३]
१९९८ वीर सावरकर पुरस्कार भारत सरकार
२००० रामानुजम पुरस्कार मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]
२००७ किंग चार्ल्स (दुसरा) पदक ब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]
२००७ डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K[७]
२००८ डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग (Honoris Causa) नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]
२००९ हूवर पदक ASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]
२००९ आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]
२०१० डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग वॉटरलू विद्यापीठ[११]

२०११ न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व. IEEE[१२]
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द

    जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
    शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
    १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
    १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
    १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
    १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
    १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
    १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
    १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
    १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
    १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
    १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
    १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
    १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
    १९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
    २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
    २००१ : सेवेतून निवृत्त.
    २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

मागील:
के.आर. नारायणन भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७ पुढील:
प्रतिभा पाटील
अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके

    अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
    इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
    ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
    इंडिया – माय-ड्रीम
    एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
    ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
    विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
    सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
    टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
    दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

    इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
    ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
    ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
    प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
    रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)

: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम– उदात्त स्वप्ने पाहणारा दृष्टा…

भारतातील मिसाइल कार्यक्रमाचे जनक, आपली सुरक्षा आपणच करावी या कार्यक्रमाचे प्रेरणास्तोत्र असणारे. अग्नीच्या यशानं आपल्या देशाला अत्युच्च अशा परमानंदाच्या अवस्थेत पोहोचवनारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.. भारतातील  सर्वोच्च नागरिक सन्मान प्राप्त करणारे आणि राष्ट्रपती पदापर्यंत पोहचणारे देशातील पहिले वैज्ञानिक… राजकारणापासून कोसो दूर असणारे व्यक्ती पण वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांची विस्मयकारक कामगिरी मुळे राष्ट्रपती पदाचे दरवाजे त्यांच्याकरिता खुले झाले होते. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या विशेष क्षेत्रात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो तेव्हा त्याच्याकरिता सगळ्या गोष्टी सहज शक्य होत जातात याच उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम…

विख्यात अणुशास्त्रज्ञ स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्राचे शिल्पकार, डीआरडीओ चे संचालक या नात्याने सर्वसामान्यांना सुपरिचित असणारे तसेच एक मनस्वी, वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी.. जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडिलधारी… ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक… आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी… कार्यशक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा हाडांचा शिक्षक अशा अनेक पैलूंनी साकारलेले बहुमुखी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम होत.

डॉ. अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम हे त्यांचे पूर्ण नाव. बंगालच्या उपसागरातील एक बेट’रामेश्वरम्’ तिथे एका नावाड्याच्या घरी जन्मलेले,त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे म्हणूनच धर्माने मुसलमान असूनही त्यांच्या परिवाराला रामेश्वर येथील मंदिरात विशेष सम्मान मिळला आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेज, तिरूची मधून बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. संस्थेतून एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संपर्कात आले.

 लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने त्यांनी बालपणातील बहुतांशी काळ आर्थिक समस्यांना तोंड देण्यात घालवला. अगदी लहान वयापासूनच त्यांनी कुटुंबाच्या अर्थार्जनासाठी पूरक म्हणून गावात वर्तमानपत्रे विकणे तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणाऱ्या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६२ भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी, बंगलोरस्थित च्या कार्यक्रमात एरोडायनॅमिक्स डिझाइन, फायबर रिईन्फोर्सड प्लास्टिक या प्रकल्पात सहभागी. १९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही संशोधन मध्ये कार्य केले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करून दाखविले. नंतर ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार,डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९७९ ते ८० थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्ट केले.

एसएलव्ही कार्यक्रमानंतर कलामांनी एकात्म क्षेपणास्त्र प्रकल्पांतर्गत १९८५ साली त्रिशुल या अग्नीबाणाची निर्मिती आणि १९८८ मध्ये रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती आणि पृथ्वी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आणि कोणत्याही परकीय मदतीशिवाय आपण आपल्या देशात इतक्या प्रगत तंत्रज्ञानाचा विकास करून ते उपयोगात आणू शकतो हे सर्वांना दाखून दिले. १९८९ साली अग्नी आणि १९९० साली आकाश व नाग या अग्नीबाणाची निर्मिती करण्यात आली. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. १९९१ मध्ये वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी.आर.डी.ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.रणगाडा व लाइट काफॅंबॅं एअरक्राफट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. १९९० च्या प्रजासत्ताक दिनी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. प्रा. विक्रम साराभाई यांनी वीस वर्षांपूर्वी बीजारोपण केलेल्या वृक्षाचं फळ पिकलं होत.

विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, अतिशय नम्र, प्रेमळ, साधे व सरळ आहेत. त्यांना वीणा वाजण्याचा, कविता करण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. निर्भयपणे जगाला सामोरे जाणारे कलाम कुरान आणि गीता दोन्हीला समान मानणारे आहेत. म्हणूनच आज सर्व धर्म,जाती संप्रदयातील लोकांना आपलेसे वाटतात. धर्म केवळ साधन आहे, अंतिम सत्याकडे  जाण्याचा तो एक पूल आहे, अंतिम साध्य नव्हे. सत्य हे तर त्याहून खूप उंच आहे.  अब्दुल कलाम यांचे संपूर्ण आयुष्य या तत्त्वावर आधारलेले आहे. ‘सर्वधर्मसमभावी’ या शब्दाचे खऱ्या अर्थाने अब्दुल कलाम हकदार आहेत.

अब्दुल कलाम यांची काम करण्याची ताकद अफाट आहे. कामाबद्दलची निष्ठा आणि देशाप्रतीचा समर्पित भाव त्यांना थकू देत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वातून सकारात्मक उर्जेचा स्तोत्र सतत उसळत असतो. आपल्या देशातील तरुणाईने देशाची प्रगती साधण्यासाठी भव्य कार्ये डोळ्यांसमोर ठेवून ती पूर्ण करण्यासाठी झटावे आणि देशाचे चित्र बदलावे असे त्यांना वाटते. मुले देशाचे भवितव्य घडवू शकतात, त्यांची मने प्रेरित करूनच आपल्याला विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल,असे त्यांचे म्हणणे आहे.

२५ जुलै२००२ ला कलाम यांनी एका दिमाखदार वेगळ्या अशा सोहळ्यात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. “स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. संकुचित ध्येय बाळगु नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.”असे त्यांचे मनापासून सांगणे आहे आणि युवकांना दिलेले हा महान संदेश आहे. २५ जुलै २००७ रोजी ते राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाले. आजपर्यंत कलाम यांना असंख्य पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. विविध विद्यापीठांनी‘डी.लिट’ हि सन्माननीय पदवी बहाल केली आहे. आर्यभट्ट पुरस्कार, नेहरू पुरस्कार, जी.एम. मोदी पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही आहेत.

अब्दुल कलाम यांना भारत सरकारने १९८१ साली’पद्मभुषण’, १९९० साली ‘पद्मविभुषण’  तर १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित करण्यात आले. देशाला भरीव असे मार्गदर्शन  करताना या थोर सुपुत्राला ‘भारतरत्न’बहाल करणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच गौरव होय.

आयुष्यात भेटलेल्या मोठ्या व्यक्तींकडून शिकत ते स्वतः त्यांच्या पंगतीत जाऊन पोचले आणि देशाच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला. चमत्कारिक प्रतीभाचे धनी असलेले अब्दुल कलाम आजच्या आणि येणाऱ्या पिठीकारिता प्रेरणा देणारे एक  महान आदर्श आहेत.
विज्ञानयोगी हरपला, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम कालवश
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 7.45 च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं.

डॉ. कलाम यांचं आयआयएम शिलाँगमध्ये विशेष लेक्चर होतं. लेक्चर सुरु असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर ते जागीच कोसळल्यामुळे त्यांना शिलाँगमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

डॉ. अब्दुल कलाम यांना 1981 साली ‘पद्मभूषण’, 1990 मध्ये ‘पद्मविभूषण’ आणि 1997 साली ‘भारतरत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. क्षेपणास्त्र आणि अवकाश संशोधन क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. अग्निपंख हे त्यांचं आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलं होतं.

THOUGHTS OF KALAM

: Don’t take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.” – A.P.J Abdul Kalam

“All Birds find shelter during a rain. But Eagle avoids rain by flying above the Clouds.” – A.P.J Abdul Kalam

“Failure will never overtake me if my definition to succeed is strong enough”. – A.P.J Abdul Kalam

“Man needs difficulties in life because they are necessary to enjoy the success.” – A.P.J Abdul Kalam

“If you want to shine like a sun. First burn like a sun.” – A.P.J Abdul Kalam 

“It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” – A.P.J Abdul Kalam

“All of us do not have equal talent. But , all of us have an equal opportunity to develop our talents.” – A.P.J Abdul Kalam

” Be more dedicated to making solid achievements than in running after swift but synthetic happiness.” -A.P.J Abdul Kalam

“Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life.”  – A.P.J Abdul Kalam

” Without your involvement you can’t succeed. With your involvement you can’t fail. ” – A.P.J Abdul Kalam

RIP sir …India’s most intellectual n composed president 🙏🙏
[7/28, 09:55] ‪+91 94032 93269‬: 🙏🙏🙏

Look at the sky. We are not alone. The whole universe is friendly to us and conspires only to give the best to those who dream and work. –Dr. A. P. J. Abdul Kalam

🙏🙏🙏
Don’t take rest after your first victory because if you fail in second, more lips are waiting to say that your first victory was just luck.” – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“All Birds find shelter during a rain. But Eagle avoids rain by flying above the Clouds.” – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“Failure will never overtake me if my definition to succeed is strong enough”. – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“Man needs difficulties in life because they are necessary to enjoy the success.” – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“If you want to shine like a sun. First burn like a sun.” – A.P.J Abdul Kalam 

🙏🙏🙏
“It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“All of us do not have equal talent. But, all of us have an equal opportunity to develop our talents.” – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“ Be more dedicated to making solid achievements than in running after swift but synthetic happiness.” -A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“Thinking should become your capital asset, no matter whatever ups and downs you come across in your life.”  – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
“ Without your involvement you can’t succeed. With your involvement you can’t fail. “ – A.P.J Abdul Kalam

🙏🙏🙏
During his interaction with students at the end Dr APJ Kalam used to deliver an oath,
“When there is righteousness of heart individual will be happy,
when individual is happy his family will be happy;
when family is happy a village or town or state or nation will be happy”

🙏🙏🙏
“Don’t declare holiday on my death, instead work an extra day, if u love me”- Dr. APJ Kalaam
🙏🙏🙏

 

यावर आपले मत नोंदवा