RSS

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद

⚪”पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात  “⚪

🔴वैशिष्ट्ये  :–

1⃣घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .

2⃣शाळेबाहेरचे जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते

3⃣अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण  , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत.े

4⃣नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .

5⃣आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.

 

📕📙 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात….

1⃣ पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा

2⃣पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट👭👬 करून चर्चा घडवून आणा.

3⃣झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 सांगण्याची संधी दया .

4⃣गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास 📝 सांगा

5⃣प्रत्येक गटातील मुलाला🙎🙇 माहिती वाचण्यास सांगा

6⃣पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा   . चर्चा घडवून आणा .

7⃣योग्य तेथे साहित्याचा💽💻📱📻📚🎶 वापर करा .

8⃣नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या

9⃣संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .

1⃣0⃣ कविता साभिनय💃 👯सादर करून घ्या .

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

चला ज्ञानरचनावादी होऊया!

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया!!!

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

 

 

ज्ञानरचनावादामध्ये शालेय मंत्रिमंडळाचे स्थान

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

🌞 रचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षक – विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण खुपच व्यस्त आहे. आपल्या अनेक वाड्या – वस्त्यांमधील शिक्षकांना 3-4   वर्ग सांभाळत प्रशासनाचा गाडि हाकावा लागतो. अशा वेळी “विद्यार्थी संसद / शाळा मंत्रीमंडळ ” महत्त्वाची भूमिका बजावते. याचे काही प्रातिनिधीक फायदे पाहूयात.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⌛रचनावादी उपक्रमासाठी वेळेचे नियोजन⌛

 

ज्ञानरचनावाद शाळेत अंमलात आणताना आपणास खुप अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण म्हणजे वेळेची! आपण रचनावादासाठी इतर साहित्य, उपक्रम नियोजन यात गुंतून जातो व मुलांना रचनावादी बनविण्यासाठी वेळ कमी पडतो. सोबत हे सर्व उपक्रम आपल्या पाठ्यक्रमाचा भाग नसल्याने आपणास पाठ्यक्रमही पुर्ण करण्याची कसरत करावी लागते. त्यातच जर शाळेमध्ये विविध माहितीचे टप्पे किंवा अहवाल आले कि मग आपण पुरते हताश होतो. व यामूळे कधी – कधी आपला भ्रमनिराश पण होतो.

यावर उपाय म्हणून व आपणास विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात “शाळा मंत्रीमंडळ” खुप उपयोगी येते.

 

✨: 🐣 मुलांच्या कल्पकतेला वाव 🐣

 

मी बरेच वेळी असे पाहिले आहे की “ज्ञानरचनावाद” म्हटले की शिक्षक स्वतःच्या कल्पक बुध्दीला ताण देऊन विविध रेडीमेड उपक्रम मुलांसमोर ठेवतात व मुले ते पुर्ण करण्यात गुंतून जातात!

मात्र यात मुलांच्या सृजनशिलतेला आव्हान देणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार करावेत नव्हे त्यांनीच पुढाकार घेऊन राबवावेत अशी अपेक्षा असते. व शिक्षक यात केवळ एका निरीक्षकाची भूमिका बजावतात! आणि यासाठी “शाळा मंत्रिमंडळ” एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते.

 

🐬 मुलांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी सर्वोत्तम 🐬

 

मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी आपण वेगवेगळे स्वतंत्र उपक्रम राबवतो. परंतु “शाळा मंत्रिमंडळ” हे यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यातून खालील गुणांचा विकास होतो.

 

1. निर्णय क्षमता

2. सहकार्याची भावना

3. पुढाकार घेऊन कार्य करणे.

4. जबाबदारीची जाणीव

5. ‘स्व’ चा विकास

6. नेतृत्व गुण

7. कार्यक्रम नियोजन

8. वक्तृत्व कौशल्य

9. परस्पर सहसंबंध

10. दुसऱ्याच्या मताचा आदर

इ.

 

🎈शिक्षकावरील कामाचा ताण हलका 🎈

 

शाळा मंत्रिमंडळ स्वतः पुढाकार घेऊन विविध उपक्रमाचे आयोजन करते, त्यामुळे शिक्षकांना इतर कामांसाठी वेळ मिळतो! व हे इतर कामे वेळेत पुर्ण केल्याने शिक्षकांची मानसिक तणावातून मुक्ती होऊन ते पूर्ण क्षमतेने अध्ययन – अध्यापनात झोकून देऊ शकतात!!!

 

☀ इतर उपक्रमांची सहजतेने अंमलबजावणी ☀

 

आपण जे दैनंदिन उपक्रम राबवतो, त्याची अंमलबजावणी शाळा मंत्रीमंडळावर सोपविल्यास आपणास इतर उपक्रमासाठी व पाठ्यक्रमासाठी वेळ मिळतो.

 

💧 यासह अनेक फायदे अपणास शाळा मंत्रीमंडळ करुन देते. फक्त त्याचे नियोजन व अंमलबजावणी व्यवस्थित करावी लागते.

 

🐢 पुढील लेखात आपण शाळा मंत्रीमंडळ नियोजन व अंमलबजावणी पाहूयात!!!

↪आपल्या भूमिकेत थोडा बदल करून

👉शिकणे 👈ही क्रिया अधिक मनोरंजक करू या .

आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .

🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

 

टिप्पण्या बंद आहेत.