RSS

इंग्रजी_बोला_उपक्रम

✅गुरुवार – इंग्रजी_बोला_उपक्रम✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इंग्रजी भाषेत भूतकाळातील क्रियेला ४ निरनिराळ्या स्वरूपात वाटण्यात आले आहे.

________________________

🔡Simple Past tense : (सिंपल पास्ट टेन्स) : साधा भूतकाळ

Ram Studied (राम स्टडीड) रामने अभ्यास केला.

कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप

👉भूतकाळात एखादी क्रिया घडली असा ज्यावेळी सहज उल्लेख करतात तेव्हा, त्याला साधा भूतकाळ म्हटले जाते.
उदा. I gave / I ate vada-pav / I drove / Dhoni Played इत्यादी.

_______________________

🔡 Past Continuous tense : (पास्ट कंटीन्यूअस टेन्स) : चालू भूतकाळ

Ram was studying (राम वॉझ स्टडिंग) राम अभ्यास करत होता.

कर्ता + was किंवा were + क्रियापदाचे ४ थे रूप

👉 भूतकाळात एखादी क्रिया चालू होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला चालू भूतकाळ असे म्हणतात.
उदा. I was writing / They were running / He was jumping / she was watching /  इत्यादी.

_______________________

🔡 Past perfect tense : (पास्ट परफेक्ट टेन्स) : पूर्ण भूतकाळ

Ram had Studied (राम ह्याड स्टडीड) रामने अभ्यास केला होता.

कर्ता + had + क्रियापदाचे ३ रे रूप

👉 भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असे जेव्हा दर्शविले जाते त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.
उदा. He had gone out / The child had slept / I had played /  इत्यादी.

_______________________

🔡 Past Perfect Continuous Tense : (पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेन्स) : चालू पूर्ण भूतकाळ

Ram had been studying – (राम ह्याड बीन स्टडिंग) राम अभ्यास करत आलेला होता.

कर्ता + had been + क्रियापदाचे ४ थे रूप

👉 भूतकाळात सुरु झालेली क्रिया काही काळापासून चालूच राहिली आणि ती क्रिया अजून चालूच होती असे दर्शवले जाते त्याला चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात.
उदा. We had been writing / She had been eating / We had been playing
_______________________

📖गृहपाठ – प्रत्येकाने प्रत्येक प्रकारची २ वाक्ये समुहावर पोस्ट करा, ज्यांना समुहावर आवडणार नाही त्यांनी गुगल फॉर्म वर देखील पाठवू शकता. 📖
_______________________

टिप्स –
✔क्रियापदांची रूपे – उदा.

➡पहिले रूप – Write, दुसरे रूप – Wrote, तिसरे रूप – Written, चौथे रूप – Writing (क्रियापदाच्या पहिल्या रुपाला  ing लावले जाते. )

💥 क्रियापदाचे चौथे रूप कसे बनवावे ?

🔹 क्रियापदाच्या शेवटी e अक्षर आले असेल तर e काढून ing लावावे. उदा. Write – Writing

🔹 क्रियापदाच्या शेवटी ie अशी २ अक्षरे असतील तर, त्याऐवजी y वापरावे, आणि ing लावावे. उदा. Lie – Lying , die – dying

🔹 ज्या क्रियापदात शेवटचे अक्षर व्यंजन असते आणि त्याअगोदरचे १ अक्षर स्वर असते  (a,e,i,o,u) तेव्हा शेवटचे व्यंजन अक्षर दोनदा लिहावे . Run – Running , Swim – Swimming इत्यादी..

🔹 ज्या क्रियापदात शेवटचे अक्षर व्यंजन असते आणि त्याअगोदरचे २ अक्षर स्वर असतात (a,e,i,o,u) तेव्हा नेहमीच्या साध्या पद्धतीने ing लावून चौथे रूप बनवावे.
Speak – Speaking, beat – beating

________________________

 

टिप्पण्या बंद आहेत.